चिमणी पाखरं
चिमणी पाखरं
*चिऊताई चिऊताई येवू का घरात ?*
*थांब, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते.*
*एक होती चिऊ आणि एक होता काऊ*
*चिमणीचे घर मेणाचे अन्*
*कावळ्याचे घर शेणाचे.*
अशा गोष्टी ऐकून झालो मोठे
मुलांनाही सांगित्या त्याच गोष्टी
पण आता नातवंडाना सांगायला
चिमण्यांच नाही दिसत घरी दारी!
मानवा झाडांची केली तू नासधूस
काँक्रिटची वाढवली तू जंगले
वनराई नष्ट केली आता कुठे बांधतील घरटीं
चिव चिव कानी नाही पडत
एक घास चिऊचा कसा भरू बाळाला
गेले ते दिन गेले राहिल्या फक्त आठवणी...
कर कृपा मानवा ठेव दाणे अन् पाणी
घरापुढे ,घरामागे किंवा खिडकीत
येऊ दे चिऊला घरटे बांधू दे खिडकीच्या व्हेंटिलेटरवर,
पुन्हा चिमणी पाखरांच राज्य येऊ दे.
मानवा दाखव थोडी माणुसकी चिमणी पाखरांच्या संवर्धनाला.
