चिमणी पाखरे
चिमणी पाखरे
एक चिमण्यांचा थवा
माझ्या अंगणी अवतरला
हरवलेला किलबिलाट
पुन्हा दारी परतला॥१॥
मुठभर दाणे पसरले
ताटभर पाणी ठेवले
चिमणी बाळे मनसोक्त
दारी माझ्या जेवले ॥२॥
काँक्रिटच्या जंगलात
पाखरे फिरेनाशी झाली
झाडावरली घरटी
कुठ दिसेनाशी झाली॥३॥
पाखरांना रहायला आता
अभयारण्य निघू लागली
प्राणिमात्रावरली सलगी
दयेची वाट बघू लागली ॥४॥
एक हात मानवतेचा
मिळून पूढे करूयात
पाखरांसाठी पाण्याच
एक मडक भरूयात ॥५॥
