STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

छत्रपती शाहू महाराज पोवाडा

छत्रपती शाहू महाराज पोवाडा

1 min
228

छत्रपती शाहू महाराज 

महाराष्ट्राचे थोर दिग्गज 

बहुजनांचे महान आधार 

कीर्ती त्यांची भारतभर 

असे हे महान विचारवंत 

समाजसेवक जन्मले महाराष्ट्रात ।।जी जी जी।।


कोल्हापुर महाराजांचे संस्थान 

आधुनिक विचार करून 

रयतेसाठी कार्याचा विडा उचलून

गरीबी हटाव नारा कृतीतून 

जातीभेदाचे केले उच्चाटन 

अंधश्रध्देला मूठ माती देऊन ।।जी जी जी ।। 


  मानवसेवा व्रत मनी ठानून 

मुक्या प्राण्यावर दया दाखवून 

चारपाण्याची सोय दिली करून 

मुक्या प्राण्याचे जीव वाचवून 

आदर्श राजा त्यांच्या सेवेतून 

जनतेचा राजा महान।।जी जी जी ।।


राजाचे आठवावे गुणगान 

न्याय रयतेला त्यांचा समान 

समस्या घेतल्या त्यांच्या जाणून 

गावोगावी दौरे काढून 

प्रजेला योग्य मदत करून 

वाचविले गरीबांचे प्राण।।जी जी जी ।।


शिक्षणाचा प्रसार खेड्या खेड्यात 

वस्तिगृहाची सोय केली शाळेत 

शिष्य घडविले पूर्ण भारतात 

आदर्श त्यांच्या विचारात 

भले करण्याची जिद्द त्यांच्या मनात 

आदर्श शिस्त त्यांच्या कामात ।।जी जी जी ।।


शेतकऱ्यांची तळमळ जानून

शेतीची औजारे पुरवून 

शेतीला मोठा आधार करून 

पूर्ण केले शेतकऱ्यांचे स्वप्न 

कष्टकरी सुखी करून 

न्याय सर्वांना देऊन समान।। जी जी जी ।।


आरक्षणाचे थोर जनक 

मागासवर्गीयाना आरक्षण देऊन 

न्याय दिला प्रजादक्ष राजान 

गुणवंतांचा आदर, सत्कार करून 

शिष्यवृत्ती त्यांना देऊन 

शिक्षणात समान संधी देऊन।।जी जी जी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational