छञपती...🚩
छञपती...🚩
सह्याद्रीच्या कडे कपारी
मर्द मराठा वाघ होता
भल्या भल्याना निजवणारा
औरंगजेबाचा बाप होता
रक्ताचा अभिषेक करुनी
शपथ स्वराज्याचे घेतली
वादळाशी संगत आमुची
गाठ तलवारीशी बांधली
महाराष्ट्राच्या मातीसाठी
ईमान आम्ही राखले
प्राण प्रणाला लावूनी
बलीदान भगव्यासाठी दिले
मराठमोळ्या भगव्यासाठी
तन मन धन अर्पण केले
दैवत अमुचे आराध्य
शिव शंभू राजांनाच पुजले
छत्रपती शिवरायांची
ख्याती ञिखंडात गाजली
रयतेचा पालनहार म्हणून
किर्ती अजय अमर झाली
स्थापिले स्वराज्य अमुचे
शौर्यवीर पराक्रमाची गाथा
असा अमुचा जाणता राजा
त्यांच्या चरणी ठेवीतो माथा
