चहा
चहा
रिमझिम पाऊस, सर्द हवा
काळ्या मेघांची मैफिल नभी
अंगणात साचलेले पाणी,
दारात ती वाट पहात उभी
नाही येत तो, थकले नेत्र
मावळली आस सारी,
माजघरात जड पावलांनी
येऊन बसली माघारी!
इतक्यात वाजली घंटी
लगबगीने उठून धावली
तो आला ना, साजण,
आरक्त भाव गाली!
तोच वीज कडाडली,
बाहेर नव्हे घरातली
'होतात कुठे इतका वेळ?
कंबरेवर हात ठेवून म्हणाली!
'ट्रेन लेट होत्या, बसने आलो,
मिळेल का एक कप चहा?'
'गॅस आहे संपला, करू काय?
तुम्हीच आता काय ते पहा!'
