STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Inspirational

चैत्र पाडवा

चैत्र पाडवा

1 min
413

कैकयीची देहबुद्धी वाईट,

श्रीरामाला वनवास घडवायचा आले तिच्या मनी

सावत्र आईची इच्छा, चौदा वर्षे राहीला वनी 


आज पताका सजल्या गल्लोगल्ली 

रांगोळी रंगली अंगणात गुढी उभारली


यशाची पाडवा सण साजरा होतो घराघरात 

कठीण काळ वनवासाचा भोगून आले

दरबारात कैकयीविषयी नाही ठेवली अढी मनात 


सीतामाईला नाही लागू दिली झळ 

लंकादहनासाठी मारूतीला दिले हत्ती बळ 

एकवचनी आहे श्रीराम त्याच्या जपाने फत्ते होते सर्व काम 


राज्याभिषेक झाला तरी नाही केला गर्व 

पाडवा सण हे प्रत्येक वर्षाचे महान पर्व 


श्रीरामाच्या पदस्पर्शाने भूमी झाली पावन 

सर्व पापांचा नाश केला, ठार मारला रावण 


भरत लक्ष्मण राहीले रामाबरोबर वचनबद्ध 

अंतःकाळीही मुखात रहावा रामनामाचा शब्द


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational