चार चारोळ्या
चार चारोळ्या
काजळ भरल्या डोळ्यांनी,
नको करू तु जादू माझ्यावर..!
मी आधीच थोडा वेडा झालोय,
तुझ्या काळ्या रेशमी केसांवर..!
खुणावू नको मला डोळ्यांनी,
बाण सुटतात काळजावर...!
मी आधीच पार घायाळ झालोय,
तुझ्या लालगुलाबी ओठांवर..!
लपून छपून पाहतेस मला,
मी जरी गर्दीत असल्यावर..!
माझेही डोळे तुलाच शोधतात,
तू आजूबाजूला नसल्यावर..!
संपून जावी रात अन् दिवसही
सखे तू जवळी असल्यावर..!
पण संपूच नयेत हे क्षण स्वर्गीय,
शेवटी जातांनाही सरणावर...!

