STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

चांगल्या सवयी

चांगल्या सवयी

1 min
444

लवकर निजे लवकर उठे

चांगल्या सवयी अंगी बाणवू या

स्वच्छतेचे नियम पाळून

स्वच्छतेचे महत्त्व सांगू या...!!


आळस सारा झटकून टाकू

आईच्या कामात मदत करू या

आजी आजोबांची सेवा करू

प्रभात-संध्यासमयी दर्शन घेऊ या...!


आई-बाबांना नमस्कार करू

शेजा-यांचा आदर करू या

टी.व्ही मोबाईल थोडे बाजूला ठेवू

पारंपरिक खेळ सारे खेळू या...!!


नित्य पहाटे व्यामाय करू या

आपले आरोग्य सुदृढ ठेवू या

सर्व भाज्या आवडीने खावू

चहा सोडून फक्त दूध पिऊ या...!!


उघड्यावरचे नकोच खाणे

घरच्या घरी पाणीपुरी बनवू या

प्राणी-पक्ष्यांवर दया करून

चिमण्यासाठी निवारा पाणी ठेवू या....!!


दररोज एका संतांचे चरित्र वाचू

एकोप्याने एकत्र राहू या

गरीबाला मदत करून

माणुसकी थोडी मनातून जपू या...!!


आकाशाचे करून निरीक्षण

जगाची सफर पुस्तकातून करू या

आई, बाबा आप्तजन, गुरूजन

सा-यांचा नितांत आदर करू या...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational