चांदणी रात्र
चांदणी रात्र
गुंतले श्वास एकमेकात
तोल जरा सावरू दे
बावर्या या मना आता
चांदणी रात्र बहरू दे....
ओंजळीत झाकोळला चेहरा तुझा
पाहून हृदयी झंकार छेडली
पाव्यातील सप्त सुरांनी
प्रीतीची गीते धुंदीत गायीली.....
पुनवेच्या बेधुंद रातीला
सोबत सजणा साथीला
दोघांचा प्रणय सुरू जाहला
शीतल चांदव्यात फुललेला....
सजणाच्या भरदार छातीवर
सजणी मस्त विसावली
बघा चांदण्या रातीला
मधाळ प्रीत छान धुंदावली....

