चांदणे प्रीतीचे
चांदणे प्रीतीचे
तुझसवे चांदण्यात
फिरण्याची और मजा
तुजविना राहण्याची
सखी नको देऊ सजा
बहरले नभांगणी
मुक्त टिपूर चांदणे
कसे कळावे सखी गं
तुझे वेडेच वागणे
जडलीय तुजवरी
प्रीत मजला अपार
जगू एकमेकांसवे
करू सुखाने संसार
जीवनात माझ्या सखी
तुजमुळे सुख आले
आयुष्याचे सार्थकच
आज प्रेमानेच झाले

