STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

2  

Jyoti gosavi

Comedy

बुद्धिबळाचा खेळ तुझा न्यारा

बुद्धिबळाचा खेळ तुझा न्यारा

1 min
518

बुद्धिबळाचा खेळच न्यारा 

प्रत्येकाची वेगळी तऱ्हा

घोडा चालतो अडीच घरे 

उंट चालतो तिरकी चाल

सरळ मुसंडी मारून हत्ती

उडवून देतो खरी धमाल

प्यादी तर ती फुकाच मरती

त्यांची होते अगणित भरती

करती उदो उदो राजाचा

कोणास काही किंमत नाही

अभिमान वाहती फुकाचा

गल्लोगल्ली ऐसे राजे 

सत्तेचा मग पट मांडती

त्यांच्यासाठी स्वार्थापोटी

आपसात मग प्यादी भांडती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy