बोट
बोट
आजचा मोकळा रस्ता छान वाटला
त्यावर पडलेला पाऊस मधेच थांबला
जरी साठले होते पाणी रस्त्यावर
त्यात सोडली होती बोट नावावर
उंच, सखल, खोलगट आड वाटेने
नाव चालली पळत भलत्याच दिशेने
तुडुंब होतं पाणी तरी फिरली
काय दिसलं अचानक म्हणून थांबली
भलं मोठं छिद्र पडलं बादलीला
नाव माझी आली आता उतरतीला
छान वाटलं सगळं एका क्षणात
नाव आली पुन्हा तिच्याच रुपात
