बंध हृदयाचे हृदयाशी
बंध हृदयाचे हृदयाशी
1 min
270
पाहता क्षणी प्रेमात तुझ्या पडलो
नजरानजर होता मी बावरलो
अबोल नयनाची भाषा तुझी
समजता नकळत मी सावरलो
नयनाची भाषा असते अबोल
तरी खूप काही बोलते
तुझ्या नजरेतून मला
सारे काही कळते
अबोल प्रीत बहरतांना
टाकते तू कटाक्ष प्रेमाचा
घायाळ करतो हृदयाला
नेत्रबाण तुझ्या नयनाचा
तुझ्याकडुन शिकलो
भाषा अबोल नयनाची
शब्दांवाचुन कळते सारे
भावना तुझ्या मनीची
बंध हृदयाचे हृदयाशी जुळले
नकळत आपले प्रेम जमले
तुला काही नाही कळले
मलासुद्धा नाही समजले