बंध हे रेशमी
बंध हे रेशमी


बंध हे रेशमी, रेशमी बंध हे
तु जिथे मी तिथे, प्रीत ही फुलते
नजरेने नजरेला, दिलेला इशारा
नको तो दुरावा, छळावा कधी रे
बंध हे रेशमी, रेशमी बंध हे
हात हाती असा, सदैव रहावा
सहवास प्रेमाचा ,क्षणांनी खुलावा
बेधुंद तु बेधुंद मी ,नशिले प्रेम रे
बंध हे रेशमी, रेशमी बंध हे
भेट ती पहिली, तुझी नी माझी
बघताक्षणी झाले , तुझीच मी
कटाक्ष ते उतरले, कायमचे मनी रे
बंध हे रेशमी, रेशमी बंध हे
येणार तु भेटीला, हुरहुर मनाला
स्वप्निल डोळ्यांनी, वाट पाहते मी
राज्य हृदयावर, तुझेच प्रिया रे
बंध हे रेशमी, रेशमी बंध हे
स्पर्शाने आठवणींच्या , शहारते बावरते
तुझ्या विचारांनी, मनही काबिज केले
जपलेल्या क्षणांवर, प्रीतिचे नाव तुझे रे