Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mita Nanwatkar

Action Classics Inspirational

3  

Mita Nanwatkar

Action Classics Inspirational

बंडखोर कवी

बंडखोर कवी

1 min
182


बंडखोर कवी मी

अन्यायाची वाचा फोडणार

धारदार लेखणीतून

बोट मर्मावर ठेवणार

सत्य असत्याची मी

योग्य शहानिशा करणार

शब्द प्रहार करून

बंड आता पुकारणार

भावभावनांना या

विचारांची जोड देणार

तर्क वितर्क जोडून

प्रबोधनात्मक लिहीणार

सामान्य जनतेच्याही

काळजातलं मी बोलणार

महिला,बाल वृद्धांच्या

न्याय्य हक्कांसाठी लढणार

रंजल्या गांजलेल्यांची

कण्खर वाणी मी होणार

मुके कोवळे भावही

अगदी अलवार जपणार

भ्रष्टाचाराचं रोपटं

मुळासकट मी उपटणार

कुप्रवृत्तीने ग्रासलेल्या

देशाचे रूपंच पालटणार

दुर्लक्षित समस्यांवर

लक्ष सरकारचे वेधणार

समस्या निर्मुलनासाठी

साहित्यच पुरक ठरणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action