बंद
बंद
आला कोरोना जगात
व्यवहारही पडलेत बंद
घरातच बंदिस्त राहूनी
कित्येकांनी जपले छंद
कुणी लिहिल्या कविता
चित्रकला संगीत जपले
महागाईने केला कळस
लुटण्या व्यापारी टपले
बेरोजगारीनेही लोकांस
केलेय असे भुकेकंगाल
उडवलीय दैना कैकांची
कळेना काय गौडबंगाल
बाधा कोरोना विषाणूची
बऱ्याच जणांनाही झाली
कोणी मूकलेत जीवासही
लाट कोरोनाची ही आली
टाळ्या थाळ्या वाजवूनी
नाहीच कोरोनाही पळाला
डॉक्टर नि संशोधकांनाही
नाही अजूनही तो कळाला
सामाजिक कार्यकर्त्यांनी
गमावले अनमोल हे जीव
जारे कोरोना निघून आता
करूनी मानवाचीच कीव
दाखवलीत कार्यकर्त्यांनी
माणुसकीची सारीच नाती
करूनी सर्वतोपरी सहाय्य
जोडली नवीच प्रेम पाती
जीवावर उदार झाले बरेच
डॉक्टर्स अन् समाजसेवक
पोलिस मदत न् रूग्णालये
ठरली जनसेवेसाठी तारक
