बळीराजा
बळीराजा


सांगा कुण्या श्रीमंताला येईल माझ्या गरिबीची सर?
घरात नाही अन्न अन् सतत गळणारं घर
पाणी नाही विहिरीला आहे ते गेलंय खोल
आणखी बोअर घेऊन किती करणार आहात जमिनीला मातीमोल?
बी-बियाणे अन् खतालाच नाही पैसा, मजुराचा वेगळा खर्च,
कर्जासाठीच्या कागदपत्रांवरही लागतं टेबलाखालचं-टेबलावरचं
घेतलेलं कर्ज आता झालं डोईजड
वीज मिळते रात्रीला कसं म्हणता तुम्ही बळीराजा लढ?
पीक आलं काढणीला की घसरतो हमीभाव
व्यापाऱ्यांचीच होते चांदी, होतात भरत आलेल्या जखमेवर घाव
मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, बायकोला नाही सणावाराला साडी,
आमच्यावर भाषण देणारे बांधताहेत चार मजली माडी
किती वेळा आत्महत्या करुन जाहीर करु माझी व्यथा?
प्रत्येकाच्या जीवनाची वेगवेगळी असते व्यथा