STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

3  

Varsha Shidore

Abstract

बिनधास्त जगणं इनाम आहे...

बिनधास्त जगणं इनाम आहे...

1 min
298

बिनधास्त जगण्यात एक 

गंभीर भारदस्तपणा आहे 

म्हणायला गेले तर आपले 

आयुष्य अगदी सुंदर आहे 


स्व निवडीचा आपणास 

समान सर्वाधिकार आहे 

तरीही काहीशी जाणीव 

अडथळ्यांची होत आहे 


विचारास मुक्तता देऊनी 

बदलाची सुरुवात आहे 

स्वतःत कधी मिसळण्याची 

एकांताची बिनधास्त वाट आहे 


चेहऱ्यावर एक विश्वास 

मौजेचा मुक्त सहवास आहे 

हास्यातला निखळ परमानंद

बिनधास्त जगणं इनाम आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract