भयानक ....
भयानक ....
दुपारची वेळ असेल अकराची ...आज ठरवलं एकटच जावं मी बाजारी .....
मी एकटीच चालत जात होते रस्त्यावर ...रस्त्यावर होती खूप रहदारी
विचित्र गाड्याच्या आवाजांनी वातावरण होते व्यस्त ...
जो तो आपल्यात होता त्रस्त ...
मी हि काय खरेदी करायची ह्याचा विचार करत चालत होते
एका गाडीने फरफटत नेले मला काही अंतरावर अचानक समजले नाही काय झाले
काही अंतरावर गाडी थांबली माझ्या तोंडात होते फक्त " आई आई ...."
माझ्या बाजूला लोकांचा होता घोळका ....
कोणीतरी लावला फोन ऍम्बुलन्सला " लवकर या ऍक्सीडेन्ट झाला "
हे ऐकताच मोठयाने मी रडू लागले आईला हाक मारू लागले ....
तेवढयात मला आईचा आवाज ऐकू आला ..
"काय झालं का रडतेस तू ? असा तिने प्रश्न विचारला ...
मी हळू हळू डोळे उघडले ....
पाहत तर आई समोर घाबरीघुबरी होऊन मला पाहत होती ....
ना तो रास्ता होता ना तो लोकांचा घोळका ना मला काही झालं होत ....
आईच्या लक्षात आलं कि मला वाईट स्वप्न पडल..
तिनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली झोप आता शांत काही विचार करू नकोस परत ...
मी मात्र घडाळ्यात पहिले वाजलेले होते पहाटेचे चार ...
मन मात्र मला भिऊ लागल होतात म्हणे पहाटेची स्वप्न खरीच फार ...
देवाचे नाव घेत मी डोळे मिटले मात्र ते वाईट स्वप्न मात्र नेहमी माझ्या लक्षात राहिले .....
