भय देई जीवना गती
भय देई जीवना गती
भय आहे जरुरी
जगण्या जीवन
भय आहे आवश्यक
बनवण्या सक्षम मन
कुणाला भय
नोकरी जाण्याचे
कुणाला भय
चोरी पकडली जाण्याचे
कुणाचे भय
पोट भरण्याचे
कुणाला भय
पोट बिघडण्याचे
कुणी भितो
काल्पनिक भुतांना
कोणी भिते
रोजच्याच माणसांना
भय हल्ल्याचे
भय अपघाताचे
स्फोटाचेही भय
भय बंदुकीचे
भय मरणाचे
सतावे कुणाला
कुणी घाबरे
जीवन जगण्याला
कुणास भीती
नव्या बदलांची
कुणास भय
दुरावतील का नाती
भय इथले
संपत नाही
जीवनात भीतीशिवाय
काही असत नाही
शूरवीरांनाही असते भय
त्यांनाही वाटते भीती
त्यावर मात करा
तरच मिळेल जीवना गती
