भूतदया...
भूतदया...
भूतदया...
प्रतिरूप मानवाचं
वानरापासून झाले
भूतदया प्राणीमात्रांवर
मानव करु लागले...
केली प्राण्यांवर दयामाया
तर प्राणी ही माणसाळतात
प्राणी ही मग मनुष्याच्या
दिल्या अन्नाला जागतात...
मूक अजान असतात प्राणी
समजून त्यांच्याशी वागावे
लेकरासारखी करावी माया
हाड थू करून ना लाथाडावे...
लावतात जीव तुम्हाला ही
जरी असले मूक जीव
नेऊन सोडले किती लांब तरी
प्रेमापोटी येतात परत ओलांडूनी शीव..
