STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract

3  

VINAYAK PATIL

Abstract

भूक

भूक

1 min
169

हव्यासापोटी धावणारी

उपाशीपोटी रहाणारी

पैशासाठी पळणारी

कुणाली ती न समजणारी

           

माणसात पाहिला मी पशु 

अंगावर आले शहारे दाटून 

भूक पैशाची कधी न समजणारी

भरुनी पोट उपाशी राहून


काहीच नसे शास्वत या जगी

मोह असे साऱ्याचा तुजला

जाताना रिकामे हात असतील

उमगुनी तू पैशामागे धावला  


सहज मिळाले की 

भूक जाईल वाढत

कष्ट करुनी दाखव

मिळेल थोडी राहत 

      

भेदभावाचे असे हे

मोठे कारण घातक

सावर तू स्वतःला

करण्या भुकेचे नाटक 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract