बहुरुपी
बहुरुपी
रंगमंचावर रंग फासुनी
वेगवेगळ्या मुखवट्यात
मी दिवस रात्र वावरतो
भिन्न भुमिकेच्या पात्रात.
लोकांचे मनोरंजन करुनी
होते माझ उदर भरणी
नाटकातली पात्रे सजीव
करतो मी रंगमुभीवरुनी.
लोकां हसवतो गमत्यांनी
कधी असला दुःखात जरी
परी मुखावरी हास्य लेवुनी
मनी तीळ तीळ तुटतो अंतरी.
वचनाचा मी ताबेदार सदा
कुणाचे नुकसान न होवो कदा
म्हणून तत्पर सदा मी कार्या
निभावतो अलग अलग अदा.
लोक हो कधी समजून घ्या
बहुरुपी विदूषकाच्या मनाला
कठीण असतं हो हे जगणे
मुखवट्या आतल्या माणसाला.
