STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Action

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Tragedy Action

बहुजनांचे उद्धारक...

बहुजनांचे उद्धारक...

1 min
35

बहुजनांचे खरे उद्धारक

राजा छत्रपती शाहू,

चरणी त्यांच्या ठेवून माथा

नतमस्तक आज होवू.


अस्पृश्यता निवारक ते 

आरक्षणाचे जनक खरे,

शैक्षणिक कार्य महान 

किर्ती कार्य रुपी उरे,

लोकराजा वाली रयतेचा

मुखी नाम त्यांचे घेऊ...


केली सामाजिक क्रांती

राजा छत्रपती शाहूंनी,

राजर्षी ही पदवी बहाल

महान कार्य त्यांचं पाहूनी,

आदर्श त्यांचा जगाला

तो आदर्श सारे घेऊ... 


शाहू राजाचा जयजयकार

जग करतंय आज सारं,

कल्याणकारी लोकराजा

असा न झाला न होणार,

कोटी कोटी वंदन त्यांना

आरती,गीत, पोवाडे गाऊ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract