STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

बहीण

बहीण

1 min
98

माझी बहीण प्रेमाची

खूप असे गं लाडाची

खेळविले बालपणी

जाण धाकटेपणाची   (१)


छोटेपणी गुजगोष्टी

शाळेतल्या सांगे मज

अभ्यासात रमे खूप

पूर आठवांचा आज   (२)


लग्नामधे करवली

हौसेमौजे मिरवली

सोडताना सासरला

धाय धाय गं रडली   (३)


प्रेम करी जीवेभावे

तिला चैन नाही जीवा

कधी विसरले तरी

झोपेपूर्वी फोन हवा   (४)


नाते जमे डहाळीचे

माहेरच्या वृक्षावरी

किती झुललो डुललो

आता गेलो दूरवरी    (५)


दाट माया गुंतवीत

नाते एकरुपतेत

राहो प्रपाताप्रमाणे

अखंडीत बरसत     (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract