भेटवस्तू
भेटवस्तू
तुला काय देऊ मी भेटवस्तू
मन माझे तुला
मी केव्हाच दिले
गोड मानुनी घे तू
आपल्या प्रेमाचे धागे
तू असे काही गुंफले
प्रत्येक सुखदुःखात
तू मला आपलेसे केलेस
प्रेमाच्या ह्या बंधनात
स्वप्न आपुले बघायचे
तुझ्यासोबत आयुष्याची
कोडी मला सोडवायची आहे
जोडीदार म्हणून तू
नशिबाचा भागीदार झालास
अर्धांगिनी म्हणून मला
तू सन्मान मला दिलास
प्रत्येक श्वासात माझ्या
तुझेच गीत आहे
या प्रेमाच्या दिवसात
तुझी साथ मागत आहे
देशील ना तू
प्रत्येक वळणावर साथ
हीच भेट समजुनी
करते मी संसाराला सुरवात

