Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Inspirational

3  

Anil Chandak

Inspirational

भेटतो देव तेथे

भेटतो देव तेथे

1 min
515



शिर्षक- भेटतो देव तिथे


कुणाचे हात,कुणाची साथ,

जीवनाच्या वाटेत,प्रश्नच फार!

साऱ्यांचे हाथ,बरबटलेले,

विश्वास ठेवावा कुणावर !!1


गुन्ह्यात अडकलेले हात,

माणसाला उध्वस्थ करतात!

परतण्याचा रस्ता नसलेला,

जीवनातूनच , हद्दपार करतात!!2


कष्टाची भाकर,खाणाऱ्यांना,

असते,स्वाभिमानाची बुज !

इमानदारी ज्यांचा असतो धर्म,

श्रम करण्यात नसते लाज !!3


वृद्ध जनांना देतात सदैव

आपुलकीचा ,मदतीचा हात!

ईश्वराचा ही असतो सदैव,

त्यांच्या पाठी,आशिर्वादाचा हात!!4


जगांत,सर्वात भाग्यवान ती,

जे गुंफतात,हात मैत्रीचे !

साखळी साखळीने जोडलेले,

निखळ,नि:स्वार्थ आनंदाचे !!5


दिन दलीत, असहाय्य लोकांची,

ज्यांना वाटते सदैव कणव!

माणुसकीचे दर्शन घडता,

भेटतो,तेथे आपणांसी देव !!6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational