akshata alias shubhada Tirodkar

Inspirational


4  

akshata alias shubhada Tirodkar

Inspirational


भेट तुझी माझी

भेट तुझी माझी

1 min 296 1 min 296

काय सांगू कशी झाली भेट तुझी माझी 

शोधत होते साहित्यावर काही तरी 

तुझ्यावर माझी नजर पडली 

क्षणात तुझी काया मला भावली 

लगेच तुला लॉगिन केले

तुझ्या प्रोफाइल मध्ये फिक्स झाले 

आठवतो तो दिवस गेल्यावर्षीचा ०६ नोव्हेंबर २०१९

भरभर करून नॉन स्टॉप नोव्हेंबर मध्ये लिहीत केले 

साहित्याच्या प्रवाहात वाहत गेले 

आणि तुझ्याही अधिक जोडले 

मारली तू थाप माझ्यावर शाबासकीची 

लिटररी कर्नल म्हणून पदवी दिली !!

"ऑथोर ऑफ द वीक" सुद्धा तू मला बनवलस 

माझ्या लेखणीला अधिक सुधारलंस..

माझ्या साहित्याला तू वाव दिलास

लेखक असल्याचा अभिमान जागवलास ..

वर्ष होत आलं तुच्या माझ्या साथीला 

असाच अखंड चालू दे आपला प्रवास साहित्याचा 

शब्द पडतील अपुरे तुझ्या बद्दल बोलण्यास काहीतरी 

स्टोरी मिरर तुझे मी मनापासून आभारी


Rate this content
Log in

More marathi poem from akshata alias shubhada Tirodkar

Similar marathi poem from Inspirational