STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

भाववाढ

भाववाढ

1 min
14.7K


या महागाईने कहर केला

मेटाकुटीला जीव आला

कसे जगावे सामान्यांनी

कळेना काहीच कुणाला


एक शिवता दुसरे फाटे

संसाराला भोकेच भोके

काय यातून मार्ग काढावा

चालेना कुणाचेच डोके


महाग झाले पेट्रोल डिझेल

भाजीपाला महाग झाला

आलेख महागाईचा आता

किती गतीने वाढू लागला


महाग झाले जगणे येथे

स्वस्त झाले मरणे आता

भाववाढ ही थांबत नाही

नको वाटते जगणे आता


संपेलच परवड जीवाची

जीवन असेच संपल्यावर

भाववाढ ही अशी बैसली

सामान्यांच्या छाताडावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy