STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

भावना

भावना

1 min
109

ज्या शब्दात सांगता येणार नाही,

पण शब्दालाही निःशब्द करते,

मनाला कळते अन् डोळ्यांत भरते ,

शब्दांनाही पुलकीत करते...

भावना...

निरागस बाळाला बघुन हसते,

तरी डोळ्यांतुन अश्रु गळते,

विरहाच्या दुःखाने होरपळते ,

एकटीच मनात धुसमसून रडते...

भावना...

कधी कुणाची कुणाला ना कळते,

कधी न सांगता बोलते ,

कधी एकाच भावाने मिळते ,

कधी भावच भावनेच्या गुंत्यात अडकते ...

भावना...

डोक्याला ही हळवे वाटते ,

मन याच तत्वावर जगते ,

दोघांचे कुठे पटले ऐकमेकांना ,

हे युद्ध अविरत चालते ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract