भावना
भावना
निसर्गाच्या भावनांशी,
माणुस करतो खेळ.
सिमेंटचे बांधून स्वतःचे महल,
महापूरांचा बसवितोय मेळ.
झाडाच्या कत्तलीने,
निसर्ग हा रडून झाला बेजार.
शिकविण्या शहाणपण,
नेले महापूरात घरदार.
निसर्गाने सदैव केला,
मानवांच्या भावनांचा विचार.
तरी खारफुटीवर ही बांधले,
भष्ष्ट्राचाऱ्याने फसवून घरदार.
स्वःताच्या हव्यासाने,
तिजोरी भरणारे झाले हैवाण.
त्यांच्या चुकीमुळे,
सामान्य माणूस हा झाला हैराण.
करूया चला जगाला,
वाचविण्यासाठी थोडा विचार.
झाडे भरपूर लावून,
करू भष्ष्ट्राचाऱ्याना ही आवर.
शोधून इतर ही कारणे,
स्वःताच्या रक्षणा लढाईची ही वेळ.
जातभेद भाव सारे विसरून,
पुन्हा दिसू दे एकजूटीचा हा मेळ.
