भावना
भावना
शब्दाच्या शिखरावरी बसूनी लिहीतो मी,
भावना व्यक्त करतो काळ्या आईच्या लेकराच्या मी.
तापत आहे उन्हात पाणी पिण्याच्या आश्वासनात,
लेकं झिजत आहे उन्हात तिला जगविण्याच्या आनंदात.
आजचे काळे रान उद्याच्या हिरव्या रानात बदलताना बघणार मी,
शब्दाच्या शिखरावरी बसूनी लिहितो मी.
पावसाच्या तोंडावरी खतपाणी जम करीतो दारातीरी,
बियानाचा दर्जा मिळावा चांगला जगतो उत्तम पिकाच्या आशेवरी,
कर्तव्य बजावत आहे परीवाराला सुख देण्यासाठी,
राबत आहे आहे आज , भविष्या घडविण्यासाठी.
सरकारी योजनेच्या आशेवरी जगताना तुला बघतो मी,
शब्दाच्या शिखरावरी बसूनी लिहितो मी.
लेकराच्या शिक्षणाचा खर्च काळ्या आईच्या कुशीतूनच निघणार,
लेकीचे लग्नाचा शृंगार ही काळी आईच करणार. घराच्या उरलेल्या छताची चिंता देखील हीलाच आहे,
सावकाराचे कर्ज फेडण्याची जबाबदारी देखील यांचीच आहे.
हिला तुझ्यावर प्रेम करतांना आज बघतो मी,
शब्दाच्या शिखरावर बसुनी लिहीतो मी .
वातावरणाच्या विश्वासावर जगतांना ही दिसत नाही, नापीक जरी असली तरी असे नाही की काही पीकत नाही.
घराला घरपण देण्यासाठी व्ययाची चिंता भागवते ही, शब्दाच्या शिखरावर बसुन आईची भावना लिहितो मी.
