भाव
भाव
भेट तुझी माझी स्मरते
रात्र उगाचच का जागते
वाट वळणावर नित्य भेटे
सल काळजात काहूर पेटे
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
अशी हक्क मैत्रीत सांगते
रात्र उशाशी बसुनी झुरते
काल परवा होती एक ती
आज उद्या ची पोरकी भाव जगते
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
हुल देतो असा विश्वास ही मग
जग बदलाची भाषा उगा बोलतो
दुर होता नाळ मातीची ती
नाती पुसतात का ओळख कधी ती
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
