भारतभूमी
भारतभूमी
भारत देश महान अमुचा
भारत देश महान....
करितो आम्ही सलाम ध्वजाला
करितो आम्ही प्रणाम..
उंच उंच शिखरावरती
फडके आमुचे निशान
भारतभू ची पवित्र माती
राखे ही सर्वांचा ईमान
जात पात धर्म विसरूनी
बंधुभाव प्रेमाने राहती
समानतेचा मंत्र जपूणी
मातृभुमीचे गुणगान गाती...
कारावास भोगूनी आम्ही
इंग्रजांना धुळ चढवली
फासावर लटकूनी आम्ही
अमर हुतात्मा झाली...
शूरवीरांच्या बलीदानाने
पवित्र झाली आमुची माती
स्वातंत्र्याच्या इतिहासाने
ज्वलंत ठेवीतो मशाल आम्ही...
देशभक्तीची अविरत गंगा
मनामनात उमटूया
विश्वशांतीची दिव्य पताका
घराघरात पोहचवूया
