STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

भारत ...

भारत ...

1 min
267

१९४७ साली भारताने घेतला स्वातंत्र्याचा श्वास....

काळ लोटुन होत आली ७२ वर्ष आज ...

खरंच आपण झालोय का स्वतंत्र ????

येतो प्रश्न मनात ...

की अजुनही जगतो आपण भितीच्या सावटात ...

थोर लोकांनी रक्त दिले स्वातंत्र्यासाठी ..

आज रक्त घेतले जाते स्वार्थासाठी ...

पुर्वी जुलुम केले परलोकानी ...

आता आपलीच माणसं दुष्ट वागतात एका देशात राहुनी...

महिला युवतीवर अत्याचार खुन चोरी लुटपाट जात पातीचे दंगे ...

सत्तेच्या राजकारणात जातोय सामान्यचा बळी ...

कळवळत नसेल का भारत मातेच मन पाहुन ही दुर्दशा ...

आपलीच माणसं लढताना एकमेकांचे रक्त सांडताना ..

आजची परिस्थिती पाहता विचार येतो मनात

खरंच हेच पाहाण्यासाठी मिळालेलं का स्वातंत्र्य...??

कधी सगळं हे थांबेल कधी सगळे आनंदाने नांदतील ‌.

कधी भारत माता परत एकदा दीर्घ श्वास घेईल????



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy