Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Varsha Shidore

Inspirational

4  

Varsha Shidore

Inspirational

भारत सुपुत्र सावरकर...

भारत सुपुत्र सावरकर...

2 mins
24.9K


मातृभूमीच्या रक्षणासाठी निष्ठेने 

संपूर्ण आयुष्य वीरतेने वेचते झाले 

उज्ज्वल भविष्यासाठी इतिहासात

जगी अजरामर सुपुत्र होऊन गेले


थोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदैव 

इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढले 

काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेतून 

कर्तव्यनिष्ठा सर्वांना दाखवून गेले 


वेळोवेळी तुरूंगवासाचे भोगताना भोग

तेजस्वीपणे लढले न विचलित होता 

लेखणीचा दाखवला खरा महाप्रताप 

काव्यरूपी प्राण देऊन न डगमगता 


हिंदुत्वाच्या माणुसकी प्रसारासाठी 

रक्षक होऊन स्थापिली हिंदूसभा 

लोकांत देशभक्तीची आस जागवून 

खंबीरपणे राहिले सेवेसाठी उभा


एकता, बंधुता, प्रेमभाव, त्यागभाव 

अशा प्रामाणिक गुणांच्या सूर्याला 

आता अमलात आणा सावरकरांना

होऊन स्वार भवितव्य घडवायला


विवेकबुद्धीची मनात ठेऊन जाण 

आधी गुलामगिरीच्या बेड्या आवळा 

विचारांच्या प्रगल्भतेतून आठवा तो 

सावरकरांसारखा धाडसी मावळा 


वैचारिकतेच्या मानवता धर्मातून

भेदभावाची भाषा समानतेत बदलवा 

संविधानाची मूल्ये आचरण करून 

मनामनात एकसंधतेचा संदेश ठसवा 


भारतमुक्तीच्या संघर्षमय लढ्याला 

आठवून वर्णभेदाची विषमता मिटवा 

सावरकरांना बदलाची मानवंदना

देऊन अभिमानाने विचार जगवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational