भारत मातेचा सेवक
भारत मातेचा सेवक
कर्तव्यात आम्ही तत्पर
कधी नाही देणार अंतर
जन्म हा माती मधला
हाक मारीतो दिन दुबळा मजला
सत्याच्या आम्ही पाठी राखा
दिन दुबळ्याच्या मी सखा
जनाजनाचा मनामध्ये
रूजवु प्रेमाचे नाते
अभिमान मला सैनिक असल्याचा
या मातेशी नाते जोडुन
झेन्डा रोविला माणुसकीचा
आम्ही भारत मातेचे सेवक
दुष्टाचे आम्ही विनाशक
अंतकाचा बिमोड करण्यास
सदैव राहु आम्ही जागृत
