बघणे!
बघणे!
अबोल्यात सांगू किती बोल आहे.
नदी ह्या किनारी किती खोल आहे.
अप्रीती प्रितीच्याच बाता निराळ्या.
अबोल्या प्रितीला किती मोल आहे.
सुनी गायकी ती शिणावून गेली.
सुन्या त्या सभेला किती ओल आहे?
कुठे लायकी ती विकायास आली.
लिलावात बाजे किती ढोल आहे.
गुणांना तुझ्या त्या दिला गोल आहे.
दिठी पाहुण्यांच्या किती फोल आहे