STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Others

3  

Rutuja kulkarni

Romance Others

बघ तुझी आठवण देतोय

बघ तुझी आठवण देतोय

1 min
266

आज पुन्हा हा पाऊस,

बघ तुझी आठवणं देतोय.

दुमडलेली ती मनाची पाने,

पुन्हा पुन्हा पलटून बघतोयं..


शांत केलेल्या त्या भावनांना,

पुन्हा पुन्हा जागवू पाहतोय.

मनाच्या त्या चंचल लाटांना,

जणू भरतीचं रूप देतोय..


विस्मरणात गेलेले ते काव्य, 

हदयात पुन्हा फेर धरतोय. 

तुझ्या नावाचा तो कागद, 

हातांमध्ये होडी बनून सजतोय.. 


पुन्हा आठवांची होडी सोडण्याची, 

ही रीत माझी जुनी, 

हा पाऊस मजा बघतोय. 

मनांत लपवलेल्या त्या प्रेमाला,

तुझ्या आठवांनी चिंब भिजवतोय..!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance