बेइमान भावनांना
बेइमान भावनांना
नयनातला वेदना ही पापणी ओलावुनी गेली
सल ती काळजातली क्षणास दुरावुनी गेली
बेइमान जाहल्या भावना मनिच्या काहूनी
काहीली जिवाची क्षितिजकडा भारावूनी गेली
कहर जहाल पचविता अंतरीची काहीली जाहली
कण कण जिंदगी अशी ही क्षणाची बांधील जाहली
मनाचे न क्षणाचे गतजन्माची ती होलिका जाहली
रित्या ओंजळीत मोती निरागस परी जहरी जाहले
दाखले मागती रित जीवनाची अशी का वाया गेली
बेइमान भावनांना गित मुक्तीच असे सांगूणी गेली
आकाशी झालर अशी सय मायेची लावूनी गेली
दखल काय घ्यावी मन असे ही दुखावुनी गेली
