STORYMIRROR

Kshitija Bapat

Romance

4  

Kshitija Bapat

Romance

बेधुंद पाऊस

बेधुंद पाऊस

1 min
421

टीप टीप बरसणारा पाऊस

बेधुंद प्रेमाचा हा नशा

ओल्या चिंब देहावरून

ओंधळतात जरधारा कशा


आडोशाला तु उभी

धो धो पाऊस धारा

नजरेला नजर

मिळता का देते इशारा


अंगावर येतो शहारा

हा झोंबणारा गार वारा

अलगद देऊन जातो

तुझ्या बाहूचा सहारा


बरसणाऱ्या या धारा

मनात फुलला मोर पिसारा

आवरू कसे मनाला

सखे बरसू दे प्रेम धारा


पहिल्या प्रेमाचा पहिला

पाऊस जागवतो उमंग

बेधुंद पाऊस आला

मनी नवी तरंग



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance