बदलते विचार बदलते जीवन...
बदलते विचार बदलते जीवन...
बदलते विचार बदलते जीवन
याने झाले सगळे वांदे.
पाश्चात्य संस्कृती अंगीकारून
झाली सगळी 'सेल्फीतली वेडीवाकडी माकडे'.
कपडेतं-कपडे तोडके झाले......;
पण.......विचार ही ओ..
कोणी पडला पाण्यात;
तर व्हिडीओ करायला अनेक पुढे,
पण वाचवायला एक ही नाही.
राक्षसी खाणं खाऊ लागले,
'सभ्यपणाचे विचार फक्त' आता
मोबाइलमधेच 'forwad' झाले,
'पुढच्या पिढीत' तर ते संपुष्टातचं आले.
'नकोत्या रोगराईमुळे' माणसांचे
'अस्तित्वचं' मात्र धोक्यात आले.
हे माणसा....
बदलते विचार बदलते जीवन हे जरी खरं ए,
पण.....
"निसर्ग" आणि "मरण" यांना तू नाही बदलले.
बदलायचेचं आहे तर.....
"नको ते विचार बदल,योग्य तेच जीवन बदल".
आता तरी सुधर.......
"भारतीय संस्कृतीची" तू कास धर;
अवघे आयुष्य होईल रे सुखकर"
