STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

बदल

बदल

1 min
211

आहे का ओळख मित्रांनो अशमयुगीन मानव मी

सुंदर या धर्तीवर सर्वात आधी पोहोचलो मी

छोट्याश्या त्या जगात आमच्या भटकंती करत फिरलो मी

अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी आयुष्यभर लढलो मी


सुरवात झाली उत्क्रांतीची तेव्हाही तयार राहिलो मी

उत्क्रांतीच्या या पथावर सदैव शोधात राहिलो मी

अग्नीचा शोध लावून जीवनात तेज आणले मी

चाकाच्या शोधाने मग जीवन गतिशील केले मी

या साऱ्यांमुळे प्राथमिक गरजांची तृष्णाही भागवली मी


काळ बदलला,वेळ सरली,अग्नीची जागा मग विजेने घेतली

चाकाच्या जागी यंत्र आले आणि तंत्रज्ञान सारे विकसित झाले

मानवाचीही जागा मग यंत्रमानवाने घेतली

बुद्धीचीही जागा संगणकाने पटकावली

काळजी मग भेडसावू लागली, माणुसकी यातून लोप पावली

याच आधुनिक आंतरजालाने मग माणसे पुन्हा जोडली


याचाही साक्षीदार ठरलो मी या बदलांमुळे सुखवलो मी 

मात्र नव्या पिढीसोबत स्वतःलाही बदललं मी

अशमयुगीन मानवाचा मग आधुनिक मानव बनलो मी

प्रगतीच्या साहाय्याने अत्याधुनिक मग झालो मी।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational