STORYMIRROR

Devendra Ambekar

Inspirational

4  

Devendra Ambekar

Inspirational

बदल हवा जगण्यामध्ये...

बदल हवा जगण्यामध्ये...

1 min
24.1K

किरकिर असा आवाज

येतो रातकिड्यांचा सगळीकडे

त्यात काहीतरी नवीन शोधायची

नजर हवी कवीकडे

बदल हवा जगण्यामध्ये थोडा

बदल हवा जगण्यामध्ये,


रोजचीच गडबड सकाळ

संध्याकाळी कामाची लगबग

स्वप्न अन विचार मात्र

फक्त शोभेचे बंधक

बदल हवा जगण्यामध्ये थोडा

बदल हवा जगण्यामध्ये,


भूमातेच्या उदरातून होतो

असंख्य वृक्षांचा जन्म

तरी नाही लज्जा कमळास

तो उमलतो अभिमानाने चिखलात

बदल हवा जगण्यामध्ये थोडा

बदल हवा जगण्यामध्ये,


तोच वारा तीच भूमी

धोधो बरसणारा पाऊसही तोच

फक्त हे झेलणारी जमीन कोरडी

एक आधार हवा सृष्टीस नवा

बदल हवा जगण्यामध्ये थोडा

बदल हवा जगण्यामध्ये,


जरी कमावला अमाप पैसा

तरी गर्व नसावा श्रीमंतीचा त्यास

असावा आनंद यशाचा अलोट सोबत

ओलावाही असावा गरिबीचा मनात

बदल हवा जगण्यामध्ये थोडा

बदल हवा जगण्यामध्ये...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational