बडबडगीत
बडबडगीत
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होता देवेश बाळा*
*देवेश ने काढला फळ्यावर एक*
*माकडाने आणला तिकडून* *केक।।1।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा**
*शिकवायला होता कृष्णा बाळा*
*कृष्णाने काढला फळ्यावर दोन*
*हत्ती ने आणला तिकडून फोन ।। 2 ।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होती आर्या* *बाळा*
*आर्या ने काढला फळ्यावर* *तीन*
*वाघाने आणली तिकडून टिफीन ।।3।।*
*जंगलात भरली प्राण्यांची* *शाळा*
*शिकवायला होते अवनी बाळा*
*अवनीने काढला फळ्यावर चार*
*सशाने आणला तिकडून कार ।। 4।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होता अक्षय* *बाळा*
*अक्षय ने काढला फळ्यावर* *पाच*
*हरीण ने आणला तिकडून काच ।।5 ।।*
*जंगलात भरली प्राण्यांची* *शाळा*
*शिकवायला होता आकाश* *बाळा*
*आकाश ने काढला फळ्यावर सहा*
*कोल्ह्याने आणला तिकडून* *चहा*।। 6।।
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होती सायली* *बाळा*
*सायलीने काढला फळ्यावर* *सात*
*लांडग्याने आणला तिकडून* *भात ।।7।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होते तनुजा बाळा*
*तनुजा ने काढला फळ्यावर आठ*
*जिराफ ने आणला तिकडून माठ।।8।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होता ललित बाळा*
*ललित ने काढला फळ्यावर नऊ*
*अस्वल ने आणली तिकडून खाऊ ।।9।।*
*जंगलात भरली प्राण्यांची शाळा*
*शिकवायला होता रोशन बाळा*
*रोशन ने काढला फळ्यावर दहा*
*सिंह आला चला पहा।।10।।*