STORYMIRROR

Chhaya Desale

Others

3  

Chhaya Desale

Others

जीवनाच्या वाटेवर

जीवनाच्या वाटेवर

1 min
325

जीवनाच्या या वाटेवर

 सुख दुःख तर येणारच 

सुख दुःखांचा पाठशिवणीचा

 खेळ रोज तर चालणारच !!


मग कधी आलेल्या संकटांना 

जिद्दीने, हिमतीने तोंड तर देणारच 

यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी 

अतोनात कष्ट तर करणारच !!


जीवनातील या रंगमंचावर

 सुखदुःखाच्या काळात साथ

 देणारे मित्र-मैत्रिणी नेहमीच

 आठवणीत राहणारच!!


जीवनात थोड्या काळासाठी

 का होईना फुलांप्रमाणे, इंद्रधनुष्याप्रमाणे इतरांना 

आनंदित,प्रफुल्लित ,सुगंधित करणारच !!


जीवनात कधीही मिळालेल्या

संधीचा पुरेपूर वापर करून

भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 

 त्या संधीचे सोने करणारच !!


वेळात वेळ काढून जीवनातील 

आठवणींची शिदोरी गोळा करून 

जवळच्या माणसांना सुखदुःखाच्या 

काळात पुरेपूर वेळ देणारच !!


दरवर्षी नव्या उमेदीने, जोमाने ,उत्साहाने

जीवनाची नवी सुरुवात करणारच

जुन्या आठवणींना स्वप्नांना

 हृदयामध्ये खोलवर जपून ठेवणारच !! 


Rate this content
Log in