Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chhaya Desale

Others

3  

Chhaya Desale

Others

पर्यावरण रक्षण

पर्यावरण रक्षण

1 min
490


"पर्यावरणाचे रक्षण करूया आपण एकत्र होऊ या ||धृ ||


 गावे, रस्ते स्वच्छ करू

 रोगराईला पळवून लावू

 लोकांचे आरोग्य राखू या

 आपण एकत्र होऊ या, पर्यावरणाचे रक्षण करूया...||1|| 


 झाडे लावू झाडे जगवू

 फुले -फळांचा आस्वाद घेऊ

 वृक्षतोडीला आळा घालूया

आपण एकत्र होवू या 

 पर्यावरणाचे रक्षण करू या...||2||


 पर्यावरणाचा नियम पाळू

 निसर्ग दौलत जपून ठेवू

दऱ्याखोऱ्यांचे पाणी पाहूया

 आपण एकत्र होवू या पर्यावरणाचे रक्षण करू या.. ||3||


 माणसातला माणूस जागवू

 पर्यावरणाचा समतोल राखू

 एकजुटीने कामे करू या

आपण एकत्र होवू या 

 पर्यावरणाचे रक्षण करू या.. ||4||


 वृक्ष लावून कर्तव्य बजावू

 कोरोनाला हाकलून लावू

 आपल्या देशाची काळजी घेऊया

आपण एकत्र होवू या

पर्यावरणाचे रक्षण करू या ..||5|| 


Rate this content
Log in