STORYMIRROR

Chhaya Desale

Others

4  

Chhaya Desale

Others

पैंजण

पैंजण

1 min
447

भाळी कुंकू ,पायी पैंजण

कानी कर्णफुले ही असे

हाती बांगड्या ,पायात जोडवे 

इंद्र नगरीतील अप्सरा दिसे।।


 चढवता सौभाग्याचा साज

 चंद्रमुखी दिसती नार 

 संसाराचे स्वप्न रंगुनी

 आनंदी आनंदी होती फार।


रुणझुण पैंजणाचा नाद

 घालुनी भरजरी शालू आज

 न करता तुलना कशाची

 पायी कोंदण शोभे साज ।।


शृंगारात भर घालूनी 

पायी पैंजण वाजती 

नजर रोखूणी साजन

 कौतुक तिचे न संपती।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन