बाप
बाप
1 min
300
मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी भासू नये
म्हणून दिन-रात कष्ट करणारा बाप
कितीही दुःखाचा डोंगर कोसळला तरी
कधीच डोळ्यात अश्रू न आणणारा बाप
बागेतल्या फुलांप्रमाणे जपणारा वाढवणारा
नेहमी समुद्रासारखी माया करणारा बाप
स्वतः काबाडकष्ट करून मुलांची हौस
पुरवणारा सुंदर जग दाखवणारा बाप
यश मिळवल्यावर गावभर पेढे
वाटून कौतुक करणारा बाप
वेळप्रसंगी चुकल्यावर, रागावणारा
क्षमा करणारा ,मार्ग दाखवणारा बाप
पाऊस चांगला पडेल या आशेवर
बी पेरून जुगार खेळणारा बाप
नेहमीच कधी ओला कधी सुका
दुष्काळच अनुभवणारा बाप
मुलीचे कन्यादान करतांना नकळतच
डोळे भरून येता लपवणारा बाप
