STORYMIRROR

Chhaya Desale

Others

4  

Chhaya Desale

Others

तिची कहाणी

तिची कहाणी

1 min
447

ती रंभा ती उर्वशी ती मेणका

 तरी ती सर्वांना नकोशी बरंका ।।


 कळी उमलण्या आधीच कळी खुडली जाते

मग कसा ज्ञानेश्वर,शिवबा जन्म घेईन माते ।।


पुरुष प्रधान संस्कृतीत नेहमीच माझी हेटाळणी 

कोण करेल या समाजात सद्विचारांची फवारणी ।।


 माझ्या जन्माने नेहमी सर्व दुःखी होतात 

तोच मुलाचा जन्म उत्साहात साजरा करतात ।।


तो वंशाचा दिवा म्हणून मिरवला जातो

 आणि मी हुंडा द्यावा लागेल म्हणून हिणवली जाते ।।


माझी ही कर्मकहाणी कधी बदलणार आहे

 कधी मला त्याचा बरोबरचे स्थान मिळणार आहे 


 खूप नको मला काही एकदा मला जन्म घेऊ दे 

उतारवयात तुझी मला आधार काठी होऊ दे ।।


मिणमिणती मेणबत्ती अंधारात प्रकाश देते

हे साऱ्या विश्वाला आता तरी कळू दे माते ।।


Rate this content
Log in